कौटुंबिकस्त्रियांचीभूमिकाआणिदर्जा
DOI:
https://doi.org/10.7492/whmaby20Abstract
भारतात सुरूवातीपासून अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्थेबरोबरच कुटूंबव्यवस्थेला महत्वाचे स्थान आहे. कारण इतर व्यवस्थेबरोबर कुटूंब व्यवस्था समाजाला व समाजातील लोकांना जोडण्याचे कार्य करते. स्त्री व पुरूष कुटूंबनिर्मीतीकरिता दोघेही आवश्यक घटक आहे. कुटूंबाचा विचार करताना कुटूंबात पुरूषाला सर्वोच्च स्थान आणि स्त्रीला निम्न स्थान मिळाले. हा प्रकार प्राचीन काळापासूनच चालत आलेला आहे. स्त्रियांचा दर्जा नेहमीच निकृष्ठ स्वरूपाचा होता. परंतु दिवसेंदिवस स्त्रियांच्या स्थितीत बदल व्हायला लागले. स्त्रिच्या शिक्षणामुळे परिस्थितीत सुधारणा होवू लागल्या. समाजाची मानसिकता बदलली त्यामुळे स्त्रियांच्या भूमिकेमध्ये व दर्जामध्ये विकासात्मक बदल व्हायला सुरुवात झाली. स्त्रियामध्ये स्वत:च्या हक्काविषयी जागृती करण्यासाठी प्रस्तुत विषय निवडला आहे.