विजय पांढरीपांडे यांच्या ऋतुरागिणी कथेतील ऋतूदर्शन
DOI:
https://doi.org/10.7492/51re3c75Abstract
विजय पांढरीपांडे यांनी मराठी साहित्यात कथा कथासाहित्याच्या रूपाने विशेष भर घातली आहे. त्यांनी एकूण सहा कथासंग्रह लिहिले आहेत. ‘ऋतुरागिणी’ या कथासंग्रहात एकूण चौदा कथा आहेत. त्यांची पहिली कथा ‘कहाणी लेखन प्रवासाची’ या कथेत त्यांनी साहित्यक्षेत्रात लेखन करतानाचा प्रवास कसा झाला याबद्दल लिहिले आहे. ‘ऋतुरागिणी’ या कथेत भारतातील प्रत्येक ऋतुचे वेगवेगळया पद्धतीने दर्शन घडविण्याचा लेखकाचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. वर्डस्वर्थ या इंग्रजी कवींच्या दाखल्यासह लेखकाने सहा ऋतुचे दर्शन घडविले आहे. इथिओपिया या देशाची राजधानी ऑडीसच्या ऋतुबद्दल लेखकाला कळले की, इथला ऋतु मस्तपैकी थंडगार असतो. एवढेच नव्हे तर तिथे कायम दोनच ऋतू असतात ही माहिती लेखकाला नवीनच होती. ‘ऋतूरागिणी’ या कथेतून लेखकाने ऋतूचे दर्शन घडविताना तिथल्या वेळेचं आणि तारखेचं मोजमापही वेगळेच आहे हे ही सांगितले. त्यामुळे वाचकांना ही कथा वाचताना उत्सुकता निर्माण होणे हेच या कथेचे बलस्थान आहे.