जी. ए. कुलकर्णी यांची प्रादेशिक कथा
DOI:
https://doi.org/10.7492/sr9ygq45Abstract
भौगोलिक आणि सांस्कृतिक मुल्ये ज्यात जोपासली जातात. त्याला प्रादेशिक वाड्.मयप्रकार असे म्हणतात. प्रादेशिक कथा समाजाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक घटकाशी संबंधित आरसा म्हणून काम करतात. प्रादेशिक कथेत प्रदेश हा सामाजिक व सांस्कृतिक धाग्याने विणलेला आहे. त्या त्या प्रदेशातील कथा, पात्रे, भाषा या घटकावर प्रादेशिकता प्रभावित होताना दिसते. प्रादेशिकतेच्या माध्यमातून कथा त्या प्रदेशाला जीवनरुप देण्याचा प्रयत्न करीत असतात. अश्याच स्वरुपाच्या कथा जी. ए. कुलकर्णी च्या लेखनीतून दिसून येतात. जी. ए. कुलकर्णी च्या प्रादेशिक कथा त्या प्रदेशाच्या समस्याबद्दल जागृरुकता निर्माण करतात. त्यांच्या कथेत स्थळ, वातावरण कुटुंब, स्थानिक प्रथेचे वर्णन दिसून येते. जी. ए. कुलकर्णी यांच्या प्रादेशिक कथा समाजातील संघर्षाचे वर्णन करतात. मानवी जीवन सतत बदलते आणि प्रवाही आहे असे दिसून येते. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेत ठोसपणे प्रादेशिकता आणि त्याची वैशिष्ट्ये यांचा समावेश होतांना दिसतो.